Thursday, February 3, 2011

बरेचदा अनाकलनियच !!

समुद्रकिनाऱ्या वरील रेतीचे कण असो वा एखाद्या प्रसंगातील सांगतांना निसटलेले क्षण असो;
धबधब्यातुन पडणाऱ्या पाण्यातुन विखुरलेले तुषार असो वा एकांतात निघालेले विचार असो;
चिंताक्रांत होउन डोक्यावर पडलेल्या वळ्या असो किंवा सौम्य स्मिताच्या खळ्या असो;
एखादा लागलेला शोध असो किंवा झालेला बोध असो;
नकळत भेटलेली नजर असो वा मुद्दाम केलेला गजर असो;
निश्वासाचा श्वास असो वा विश्वसाचा भास असो;
 प्रितीचा सुगंध असो किंवा अन्यायाचा बंध असो;
जीवनाचा काठ असो किंवा गुरूंचा पाठ असो;
                                           सर्वच अनाकलनीय...अतुलनीय...कधीच हातात न येणारे....

Wednesday, February 2, 2011

"मी" पण..

आयुष्यात सगळ काही "मी" करू शकतो असा गोड़ गैरसमज असलेली लोक असतात पण थोड्या  आवक्याबाहेर असणाऱ्या किंबहुना समजण्यापलिकडे असणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात जिकडे "मी" मीरवताना दुर्लक्ष होते...

ज्या प्रमाणे कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ह्याचा हक्क मनुष्याला नाही त्याच प्रमाणे मरणाबद्दलचा सुध्हा. जशा जन्म अणि मृत्यु ह्या गोष्टी प्रत्येकावर थोपवल्या जातात  त्याच प्रमाणे 'आयुष्य', वैयक्तिक जीवन, एकटेपण, जबाबदाऱ्या, विचार, मैत्री, नाते, बंधने अशा बऱ्याच गोष्टी माणसावर लादल्या जातात. त्यातली प्रत्येक गोष्ट लादलीच जाते असे नाही पण यातली प्रत्येक गोष्ट किंवा एका पेक्षा जास्त गोष्टी कोणा ना कोणा वर तरी लादल्या जातातच. बाकी गोष्टी माणुस स्वीकारतो किंवा त्याही स्वीकारण्यास भाग पडले जाते.  

अर्थात त्या लादलेल्या गोष्टींची किम्मत लादणाऱ्या पेक्षा ज्यावर लादल्या गेल्या तोच आयुष्यभर भरतो... इथे मनुष्याची या संदर्भातली दुर्बलता कळते... म्हणूनच माणुस नियती पुढे लाचारच असतो. त्याची जाणीव कोणाला असते कोणाला नसते, कोणी जाणीव करून घेतो व कोणी मुद्दाम त्या कड़े डोळेझाक करतो..

माणुस स्वतःहाचे भविष्य घडवतो म्हणजे काय?   निर्भिड होउन, प्रत्येक अडचणीना योग्य वेळी, योग्य निर्णय घेउन आलेल्या संधीला/ वेळेला सामोरे जातो आणि त्याचे फलित त्याला चांगले किंवा वाइट मिळते. आता भविष्य घडवले म्हणजे चांगलेच फळ. माणुस नेहमी 'मी' हा निर्णय घेतला, 'मी' असे केले - तसे केले , प्रयत्नांची पराकाष्ट केली अणि 'हे' घडवले याचा डंका मिरवतो. पण पराकाष्टा करण्या आधी जर नियतीने तुम्हाला ती संधीच नसती  दिली तर? अशा संधी, आधीच्या संधीच्या निवड़ी वर अवलंबून, प्रत्येक वेळी नियती आपल्याला देऊन आपल्या सोबत खेळ  खेळत असते. अणि आपण त्या खेळाचे निर्माते आपण असल्याच्या भासात आपण आयुष्यभर जगतो(?)...... 

Tuesday, February 1, 2011

महाराष्ट्राचा इतिहास !!

कालानुक्रमे :
i) प्रभु श्रीराम ३००० BCE (ख्रिस्त जन्मा पहिले) वर्षां पाहिले दंडकरण्या मधे आले
ii)  अशोक राजा ची राजधानी ( मगध साम्राज्य ) "सोपास" मुंबई च्या उत्तरेकडे 
iii) सातवाहन २३० BCE (ख्रिस्त जन्मा पाहिले) ते २२५ AD (ख्रिस्त जन्मा नंतर)
      त्या काळात महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्व वाढले वा प्रगति झाली. तेव्हा येथील भाषा "महाराष्ट्री" या नावाने      प्रचलित होती. त्या नंतर "मराठी" या नवत रूपांतर झाले. राजा गौतमी पुत्र "सत्कर्नि" ने शालिवाहन शक सुरु केले.

iv) वाकाटक राजा (विदर्भ राजा) २५० CE ते ५२५ CE
v) ७५३ CE नंतर राष्ट्रकुटाचे राज्य पूर्ण भारतभर पसरले  ९७३ CE पर्यंत.
vi) चालुक्य (बदामी राजधानी ) राष्ट्रकुटाचा पराभव करून राज्य करू लागले ११८९ CE  पर्यंत
vii) त्या नंतर देवगिरीचे यादव
viii) अल्लौद्दीन खिलजी व त्या नंतर मोहम्मद बिन तुघलकाने दख्हनचे पठार जिंकले (१३ वे शतक)
ix) १३५१ मधे तुघ्लाकाचा पराभव बहमनी सत्ते कडून (बहमनिंची राजधानी "गुलबर्गा")
x) बहमनिन्नी १५० वर्षांहून अधिक राज्य केले
xi) बहमनिंचा बीमोड आणि ५  शाह्यामधे  विभागणी
    १) निजामशाही (अहमदनगर) २) आदिलशाही (विजापुर) ३) क़ुतुबशाही (गोवलकोंदा)४) बीदरशाही (बीदर) ५) इमाद शाही (बेरार)
xii) १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सुरवात
xiii) शिवाजी राजे सफल व १६७४ मधे राज्याभिषेक
xiv) संभाजी राजे १६८० मधे सत्तेवर
xv) १७०८  मधे राजरामाचा पुतण्या आणि संभाजी चा पुत्र शाहू याने बालाजी विश्वनाथाला पेशवा केले
xvi) मराठे पूर्ण भारतात पसरले
    १) ग्वालियर=शिंदे  २) इंदौर=होळकर ३) बड़ोदा=गायकवाड ४)धर=पवार
xvii) पानिपतात मराठ्यांचा पराभव
xviii) १७७७ ते १८१८ पर्यंत ३ मराठे- इंग्रज युद्ध
xix) १८१९ मधे पेशवाई संपुष्टात

असच थोड प्रेमावरही, आवडलेलं

रोखले नयनत आसू,
मी शब्द ओठी रोखले.
पाहिले नाही तिला मी,
नजरेस माझ्या रोखले.
सांगुच का या संयमाला,
मी असा का सोसला ?
माहित होते मजला,
इंकार नसता सोसला....
                            वा. वा.

ओढ़...

भरतीच्या वेळी, खडकाळ समुद्र किनाऱ्यावर, खड़कावर आलेल्या पाण्याला, जसे, आहोटिच्या वेळी खाली गेलेल्या पाण्यात एकरूप होऊन, खळखळण्याची   ओढ़ असते; ती असते ओढ़ ...

स्वतःमधे नवचैतन्य  सामावण्यासाठी रक्त ज्या ओढीने ह्रदयाकडे जाते; ती ओढ़...

पोथी वाचत असताना दुधाचं भांड उघडं आहे समजल्यावर, पोथी लवकर संपण्याची ओढ़.. ती ओढ़ ....

एखाद्या मरणशैय्येवर पडलेल्या वादकाच्या डोळ्यात असलेली, वाद्याचा एकतरी स्वर ऐकण्याची केविलवाणी भावना आणि ती ऐकली नाही त होणारी मरणाकान्त तगतग, असते ओढ़... 

डग्ग्याचा नाद उमटल्यावर चाटीच्या आवाज ऐकण्याची आतुरता म्हणजे ओढ़..