Monday, March 21, 2011

मैत्री

मैत्री ढगांसारखी असावी. कुठेही हुंदडणारी पण मुळ गुणधर्म न सोडणारी. त्याच गुणधर्माचे सर्व मित्र जमा करणारी; त्यांच्या चुकीच्या गुंधार्मासाहित. ढगा सारखे, विराल्यावरही, प्रसन्नता पसरवणारी, चैतन्य फुलवणारी, आनंद देणारी. समृद्ध असणारी आणि समृद्ध बनवणारी. प्रसंगी तेवढीच तेजस्वी, प्रखर, गंभीर आणि भीतीदायक वाटणारी. आपल्या मैत्रीची गडद छाया पाडणारी. मऊ, प्रसंगी दाट, कोणालाही आतलं न दिसू देणारी व प्रसंगी तेवढीच विलोभनीय असणारी. प्रसंगी आपल अस्तित्वच न दिसू देणारी पण अस्तित्वात असणारी. उंच, चेडता न येणारी. कधीही कितीही प्रयत्न केले तरी विलग न होणारी. वादळात विखुरल्यावर हि काही काळानी तेवढ्याच आपुलकीनी, ओढीने, जोशाने जवळ येणारी. सूर्याची तीव्रता स्वतः झेलून सावली देणारी.

Friday, March 18, 2011

पुनरुत्थानाची दिशा

जगाच्या एका टोकावर, स्तब्द बसुनी बघावे
छिन्न भिन्न मानवतेच्या, लक्तरांचे देखावे
आक्रंदणाऱ्या झोंबणाऱ्या, वेदनांचे विसावे
रक्तरंजित इतिहासाच्या, आक्रोशाचे पुरावे
 
तेजोमय अशा अस्मितेचे, काटे असे रुतावे
उमजुनी अस्तित्वाचे धोके, नपुंसकतेचे कोश फेकावे
घनदाट हिरव्या किंकीरात, वणवे जसे पेटावे
अंधारमय असे विश्व, झळाळून तसे काढावे
 
ठासुनी चैतन्याचा प्रवाह, धमन्यांनी काठोकाठ फुगावे
मरगळलेल्या शूरवीरांनी , खडबडून ताठ उठावे
नवनिर्माणाचे लक्ष घेऊन, पुनरुत्थानासाठी कसावे
ऐसे सार्थ करावे कि, दुःखी कोणी नसावे
                          
                                             - वियुष साकरकार

Thursday, March 17, 2011

वाटते असे करावे..

वाटते;
जगाच्या या वाटेवर, नित्य असावे असे
माधवाच्या मुकुटावर, पिस असावे जसे.
वाटते;
आक्रोश या जगताचा, सामावून घ्यावा मनात
गंध त्या कारुण्याचा,  विरून जावा क्षणात
वाटते;
सागराएवढा संयम वाटून, वाऱ्यामध्ये प्रेम भरून
काम,क्रोध,मत्सर मारून, टाकावे दुःख सारून.
वाटते;
विश्वासघाताचा,द्वेषाचा, अंश नुरावा काही
प्रेमाशिवाय न कोणाचा, स्पर्श अंतरी राही.
वाटते;
प्रार्थावे त्या ईश्वरास, हेच मागण्यासाठी
घालवू दे हे जीवन, फक्त मानव सेवेसाठी.
                          - वियुष साकरकार

Wednesday, March 16, 2011

आता तरी मनी तू येशील का?

भारावल्या दिशा, अंधारल्या निशा
निजल्या राई, उमलल्या जाई
     आता तरी मनी तू, येशील का?
निशब्द तारे, गारठले वारे
पानांचा मंद्र, मंदावला चंद्र
     आता तरी मनी तू, येशील का?
आवरले आचार, स्तब्दले विचार
मिटले अक्ष, जाहलो दक्ष
     आता तरी मनी तू, येशील का?
उठले काहुर, ऐकण्या चाहूल
वेळेची निपूर, बोलण्या विपुल
     आता तरी मनी तू, येशील का?
खळी तू पडून, पदराच्या आडून
थोडीशी लाजून, डोळ्यात पाहून
     आता तरी मनी तू, येशील का?
हलले पर्ण, थिजले कर्ण
विसरलो धर्म, भुललो कर्म
     आता तरी मनी तू, येशील का?
दिलेली ग्वाही, अपूर्ण राही
राहिली तीही, राखण्या काही
     आता तरी मनी तू, येशील का?
ऐकण्या सत्य, सांगुनी मिथ्य
प्रकाशाच्या तोडीने,  भेटण्याच्या ओढीने
    आता तरी मनी तू, येशील का?
प्रेमाचा महिमा, तुझ्याविना राहीना
 त्रासून का होईना....
    आता तरी मनी तू, येशील का?

                                     - वियुष साकरकार

Monday, March 14, 2011

वेदनेचा अंश..

अश्रूंच्याहि काही वेदना असतात, रक्ताचीही वेदना असते. अथांग सागराची, रिकाम्या सिंहासनाची; शस्त्राची व त्याच्या धारेची सुद्धा वेदना असते. हास्याचीही वेदना असते तसेच दास्याचीही. कठोरतेची वेदना असते
आणि मृदुतेचीहि. जयाचीहि वेदना असते आणि पराजयाचीही. जन्माचीही वेदना आणि मृत्युचीही. 

म्हणूनच ज्या बऱ्याच गोष्टी जरी सुख, आनंद, दुःख किंवा यातना देऊन जात असतील तरी वेदना हीच त्यांची सर्वात जवळची सखी असते. पण वेदना हि नेहमीच एकटी असते, एकटी असते...

प्रेमाची चाहूल..

जीवाची तगमग, मनाची लगबग
विचारच खुळा, सुकलेला गळा
प्रेमाची आस, प्रयत्नांची कास
डोक्यावर वळी, गालावर खळी
सावळा वर्ण, चाणाक्ष कर्ण
रागाची छट, केसांची बट
विरुद्ध बघण, चाहूल टिपण
केसांशी खेळण, तुझ्यावर भाळण
तुझ सावरण, स्वताला आवरण
लाजून हसण, आमचंच फसण
डोळ्यातील भाव, ओठांवरलं नाव
मनात भलतंच, अंतर सलतच....

                असच काहीतरी प्रेमाची चाहूल देऊन जात...

                                       - वियुष साकरकार

कधी कधीची मनस्थिती..

कधी कधी फार रडव वाटत, डोळे भरून येतात, जीव तगमगतो. पण कारण काय हेच लक्षात येत नाही. स्वतःचा हळवेपण आहे, कमजोरी आहे, एकटेपणा आहे, जे पाहिजे ते मिळत नाही कि काय करायचं आहे ते समजत नाही; काहीच म्हणजे काहीच कळत नाही. फक्त रडावं वाटते.... रडत रहाव वाटते. कोणाला सांगाव, का सांगाव, किती सांगाव, कस सांगाव ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर स्वतःच स्वताला विचारून व सांगूनहि काय होणार आहे? सगळेच प्रश्न अनुत्तरीत, न उलगडलेले! परत तीच चीड चीड, कधी स्वतःवर तर कधी दुसऱ्यावर निघणारी. माणूस हा खरच विचारांच्या दलदलीत फसलेला प्राणी आहे. जेवढा प्रयत्न बाहेर निघण्यासाठी कराल तेवढे जास्त फसत जाल.

कधी वाटते जिथे कोणीच नाही, असं कुठे तरी दूर  निघून जाव. सगळ्यांपासूनच दूर, कधीच कोणाच्याच कधीच संपर्कात न याव. कुणीतरी म्हटले आहे कि कुठेहि गेल तरी सोबत येणारी गोष्ट म्हणजे "सावली". पण "आपले विचार" हि पहिले गोष्ट आहे जी कधीच माणसाचा साथ सोडत नाही. कुठेहि गेले तरी.

आयुष्यात जर सगळ्यात जास्त त्रास, वेदना, तळमळ जर जीवाला होत असेल तर विश्वासघाताने. कोणीही जवळची व्यक्ती जर कधी विश्वासघात करत असेल तर त्याहून दुखदायक काहीही नसेल. दुसऱ्या कोणत्याही वेदना त्या शारीरिक असो व मानसिक; व्यक्त केल्याने कमी अधिक प्रमाणात शमतात. पण विश्वासघाताचे व्रण नेहमीच ताजे राहतात.