Monday, March 14, 2011

कधी कधीची मनस्थिती..

कधी कधी फार रडव वाटत, डोळे भरून येतात, जीव तगमगतो. पण कारण काय हेच लक्षात येत नाही. स्वतःचा हळवेपण आहे, कमजोरी आहे, एकटेपणा आहे, जे पाहिजे ते मिळत नाही कि काय करायचं आहे ते समजत नाही; काहीच म्हणजे काहीच कळत नाही. फक्त रडावं वाटते.... रडत रहाव वाटते. कोणाला सांगाव, का सांगाव, किती सांगाव, कस सांगाव ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर स्वतःच स्वताला विचारून व सांगूनहि काय होणार आहे? सगळेच प्रश्न अनुत्तरीत, न उलगडलेले! परत तीच चीड चीड, कधी स्वतःवर तर कधी दुसऱ्यावर निघणारी. माणूस हा खरच विचारांच्या दलदलीत फसलेला प्राणी आहे. जेवढा प्रयत्न बाहेर निघण्यासाठी कराल तेवढे जास्त फसत जाल.

कधी वाटते जिथे कोणीच नाही, असं कुठे तरी दूर  निघून जाव. सगळ्यांपासूनच दूर, कधीच कोणाच्याच कधीच संपर्कात न याव. कुणीतरी म्हटले आहे कि कुठेहि गेल तरी सोबत येणारी गोष्ट म्हणजे "सावली". पण "आपले विचार" हि पहिले गोष्ट आहे जी कधीच माणसाचा साथ सोडत नाही. कुठेहि गेले तरी.

आयुष्यात जर सगळ्यात जास्त त्रास, वेदना, तळमळ जर जीवाला होत असेल तर विश्वासघाताने. कोणीही जवळची व्यक्ती जर कधी विश्वासघात करत असेल तर त्याहून दुखदायक काहीही नसेल. दुसऱ्या कोणत्याही वेदना त्या शारीरिक असो व मानसिक; व्यक्त केल्याने कमी अधिक प्रमाणात शमतात. पण विश्वासघाताचे व्रण नेहमीच ताजे राहतात.

No comments:

Post a Comment