Tuesday, June 30, 2026

अज्ञात प्रेमाची कहाणी....


मनानी हेरले

पाणी मुरले

दिवस फिरले

स्वप्न विरले

 

प्रेमाचा बंध फुटला 

धाकाचा वेत तुटला 

हक्कचा कंठ दाटला 

इच्छांचा सागर आटला


सुगंध विरला 

विश्वास हरला

गैरसमज भरला

मतभेद उरला 


भ्रांती पसरली

वचन विसरली 

उमेद ओसरली  

शांती उतरली


झाली उपेक्षा 

उरली नाही अपेक्षा

आता नको परीक्षा

सोडून दिली प्रतीक्षा

Monday, October 20, 2025

 प्रमाण..


आयुष्य हे अनेक गोष्टींच्या "प्रमाणाची" रासायनिक प्रक्रिया आहे. कधी, किती, काय, कोणासोबत, केव्हा व कसे हे अत्यंत महत्वाचे घटक. प्रमाण दोन प्रकारचे एक मात्रा आणि एक पुरावा. दोन्ही तितकेच महत्वाचे. एक प्रमाण दुसऱ्या प्रमाणाचे कारक (कोणत्याही गोष्टीची मात्रा त्यातून येणाऱ्या परिणामाच्या पुराव्याचे कारक). या दोन प्रमाणामध्ये अडकलेला आणि गुरफटलेला "मनुष्य". स्वतः जाळे विणणारा आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड करणारा तोच "मनुष्य". या प्रमाणांचा अचूक समतोल साधणारा मनुष्यच "स्थितप्रज्ञ"


प्रमाण (दोन्ही) बोलण्याचे, वागण्याचे, राहण्याचे, बदलण्याचे. करण्याचे, देण्याचे, घेण्याचे, फेडण्याचे. विश्वासाचे, प्रेमाचे, रागाचे. त्यागाचे, कर्तव्याचे, जबाबदारीचे, अधिकाराचे. नकाराचे, होकाराचे, संयमाचे, द्वेषाचे. स्वार्थाचे, परोपकाराचे, यशाचे, अपयशाचे. सुबुद्धीचे, दुर्बुद्धीचे, कीर्तीचे, सन्मानाचे, प्रगतीचे, अधोगतीचे. हसण्याचे, रडण्याचे, चिडण्याचे. गोन्जारण्याचे, खाजवण्याचे, पडण्याचे, पडण्याचे, उठण्याचे, उठवण्याचे, कठोरपणाचे, सौम्यपणाचे. दिसण्याचे, असण्याचे, दाखवण्याचे आणि बघण्याचे. बांधण्याचे, तोडण्याचे, बनवण्याचे, मनवण्याचे. कुरघोडीचे, राजकारणाचे. मेहनतीचे, कृतीचे, स्मृतीचे आणि विस्मृतीचे. सोडण्याचे, धरण्याचे. वेळेचे, संधीचे, उपयोगाचे, उपभोगाचे. समतेचे, विषमतेचे, स्वाभिमानाचे, अहंकाराचे प्रमाणच...

Wednesday, January 29, 2025

तु.. .. 

जीवनाची उमेद तु, जिंकण्याची उमेद तु,

श्कवासाची उणीव तु, कर्तव्याची जाणीव तु,
प्रेमाची आस तु, पुरणपोळीचा घास तु
सत्याचा भास तु,, अस्तित्वाचा आभास तु

पत्नीचा बंध तु, भविष्याचा गंध तु,
अविस्मरणीय सुगंध तु, वागण्याला धरबंध तु
प्रत्येक श्वास तु, अतूट विश्वास तु,
जिव्हाळ्याचा स्पर्श तु, इच्छापूर्ती चा हर्ष तु,

तूच तु, मीच तु.....मीच तु....

Monday, January 12, 2015

असंच अस्ताव्यस्त...

आयुष्य हे "रिकामे" आणि "अर्थहीन" आहे. आपण जे आयुष्यात भरतो ते दिसते आणि जो अर्थ देतो तसे भासते !!!

प्रेमाचा अंकुर अविनाशी आहे आणि द्वेषाचा अंकुर विनाशी.

माणुस आयुष्यात सर्वात जास्त एकाच गोष्टीवर प्रेम करतो - त्याचा जीव. ते कळत असो वा नकळत.

आयुष्य जगण्याची सगळ्यात खालची पातळी म्हणजे आयुष्य "कारणांसह" जगणे, आणि उच्चतम पातळी म्हणजे आयुष्याला "कारण" असणे.





परतलो..


बरच हलक वाटत आहे… खूप दिवसांनी परतलो…  हरवलो होतो कि जगत होतो माहित नाही… बरच घडल, बरच दवडल, बरच खोडल… बरच मिळवलं, बरच गमवलं, बरच कमवलं… खुप विसरलो, खुप घसरलो… खुप सरावलो, खुप सुधरलो.

झेप घेतली आहे…क्षितीजा पलीकडे लक्ष्य आहे… प्रवास लांबचा आहे… सोबत तुमची आहे… भेटूच … !!