Monday, March 14, 2011

वेदनेचा अंश..

अश्रूंच्याहि काही वेदना असतात, रक्ताचीही वेदना असते. अथांग सागराची, रिकाम्या सिंहासनाची; शस्त्राची व त्याच्या धारेची सुद्धा वेदना असते. हास्याचीही वेदना असते तसेच दास्याचीही. कठोरतेची वेदना असते
आणि मृदुतेचीहि. जयाचीहि वेदना असते आणि पराजयाचीही. जन्माचीही वेदना आणि मृत्युचीही. 

म्हणूनच ज्या बऱ्याच गोष्टी जरी सुख, आनंद, दुःख किंवा यातना देऊन जात असतील तरी वेदना हीच त्यांची सर्वात जवळची सखी असते. पण वेदना हि नेहमीच एकटी असते, एकटी असते...

1 comment:

  1. वेदनेमुळे माणसाला सुखाची जाणीव होते तसेच दुखामुळे माणसाला अधिक संवेदनशील होतो!

    ReplyDelete