Monday, March 21, 2011

मैत्री

मैत्री ढगांसारखी असावी. कुठेही हुंदडणारी पण मुळ गुणधर्म न सोडणारी. त्याच गुणधर्माचे सर्व मित्र जमा करणारी; त्यांच्या चुकीच्या गुंधार्मासाहित. ढगा सारखे, विराल्यावरही, प्रसन्नता पसरवणारी, चैतन्य फुलवणारी, आनंद देणारी. समृद्ध असणारी आणि समृद्ध बनवणारी. प्रसंगी तेवढीच तेजस्वी, प्रखर, गंभीर आणि भीतीदायक वाटणारी. आपल्या मैत्रीची गडद छाया पाडणारी. मऊ, प्रसंगी दाट, कोणालाही आतलं न दिसू देणारी व प्रसंगी तेवढीच विलोभनीय असणारी. प्रसंगी आपल अस्तित्वच न दिसू देणारी पण अस्तित्वात असणारी. उंच, चेडता न येणारी. कधीही कितीही प्रयत्न केले तरी विलग न होणारी. वादळात विखुरल्यावर हि काही काळानी तेवढ्याच आपुलकीनी, ओढीने, जोशाने जवळ येणारी. सूर्याची तीव्रता स्वतः झेलून सावली देणारी.

1 comment:

  1. ढगा सारखे जमले आहे वियुष्या, विचारांनी मोठे गहरे पण मांड्णी ने हल्केफ़ुल्के.....
    -गुरुनाथ

    ReplyDelete