Wednesday, March 16, 2011

आता तरी मनी तू येशील का?

भारावल्या दिशा, अंधारल्या निशा
निजल्या राई, उमलल्या जाई
     आता तरी मनी तू, येशील का?
निशब्द तारे, गारठले वारे
पानांचा मंद्र, मंदावला चंद्र
     आता तरी मनी तू, येशील का?
आवरले आचार, स्तब्दले विचार
मिटले अक्ष, जाहलो दक्ष
     आता तरी मनी तू, येशील का?
उठले काहुर, ऐकण्या चाहूल
वेळेची निपूर, बोलण्या विपुल
     आता तरी मनी तू, येशील का?
खळी तू पडून, पदराच्या आडून
थोडीशी लाजून, डोळ्यात पाहून
     आता तरी मनी तू, येशील का?
हलले पर्ण, थिजले कर्ण
विसरलो धर्म, भुललो कर्म
     आता तरी मनी तू, येशील का?
दिलेली ग्वाही, अपूर्ण राही
राहिली तीही, राखण्या काही
     आता तरी मनी तू, येशील का?
ऐकण्या सत्य, सांगुनी मिथ्य
प्रकाशाच्या तोडीने,  भेटण्याच्या ओढीने
    आता तरी मनी तू, येशील का?
प्रेमाचा महिमा, तुझ्याविना राहीना
 त्रासून का होईना....
    आता तरी मनी तू, येशील का?

                                     - वियुष साकरकार

1 comment:

  1. येईल रे नक्की येईल ... ती ही तुझी अशीच वाट पाहत असेल ... बस तो क्षन यावा लागेल ... भेटीचा !!!

    कविता छान आहे !!!
    रंजन ....

    ReplyDelete