Monday, February 14, 2011

इच्छा

आयुष्या संपण्यावर आले तरी इच्छांची यादी काही संपत नाही. तसे पाहिले त त्यावेळीही "जगावं" हि इच्छाच. शेवटी इच्छा हि कधी शेवटची नसतेच. ती पूर्ण झाली कि नवीन पण शेवटची(?) इच्छा तयार होते. पण मग ती शेवटची असल्याने सर्वांसाठी जे त्या इच्छेशी निगडीत आहेत त्यांवर बंधनकारक. बर असे असूनही शेवटच्या इछेची खासियत अशी कि कमाल वेळेस दुसऱ्याच्या इछेचा बळी घेऊनच तिचा जन्म होतो.
नवल याचं कि पिंड दानाच्या वेळी, कावळा शिवला हे एखाद्याच्या इच्छापुरती चे द्योतक. तसं पाहिले तर एखादी इच्छापूर्ती हि दुसऱ्या इछेची जन्मवेळ. मनुष्याचं मन एवढ सैरावैरा धावते कि त्यात कोणत्या इछेचा कधी जन्म होईल हे सांगण तितकच कठीण जेवढ कोणत्याही गोष्टीचे भविष्य.  कोणत्याही इच्छेची खोली सांगण कठीण जशी डोळ्यातली खोली सांगण. कोणत्याही इछेची वेदना सांगण तेवढाच कठीण जेवढी अथांग सागराची.

आठवणी

आयुष्यातल्या किती आठवणी सूर्यफुलाच्या बियांसारख्या गोड असतात. त्या बियांची टरफले काढून आतला गर खायचा असतो. तसे पाहिले तर जीवन सुद्धा सूर्यफुला प्रमाणे आहे, सूर्याच्या कलेप्रमाणे जसे सुर्यफुल रुख बदलते तसेच मनुष्याचे जीवन काळाच्या वेधाने रुख बदलणारे. प्रत्येक आठवणीतील गोडपणा तसा वेगळाच आणि काही आठवणी काही बियांसारख्या कडू; थुन्कल्यावरही कडूपणाची चव सोडून जाणाऱ्या. प्रत्येक आठवणीत एक पोकळी; कधीच न भरून निघणारी. काळाच्या ओघात काही बिया वाऱ्या-वादळांनी खाली पडतात तर काही अजून दृढ बनतात; तसेच आठवणींचे. काही सुर्यफुल लहानपणीच कोमेजतात तर काही भरधाव वेगानी सर्वांच्या पुढे जाऊन स्वतःला जास्त भरतात; तसेच प्रत्येकाच्या आयुष्याचे. काही बालपणीच्या आठवणी जश्या गहाळ होतात, लक्षात राहातच नाहीत, कधी आठवतच नाहीत तशी सूर्यफुलाच्या मध्याशी असलेली रिकामिजागी, कितीही इच्छा असली तरी कधी न भरणारी. एका गुणधर्माची पण त्याच प्रमाणे दुबळेपणाची जाणीव करून देणारी. जीवनाचा गाभारच पोकळ असल्याची सतत जाणीव करून देणारी. आणि एखाद सुर्यफुल, कितीही खाली दबलं तरी सूर्यप्रकाशात येण्याची आकांक्षा असणारं, कदाचित नेहमी असफल प्रयत्न करणारं......

अडचण

माणसाला स्वतःच्या आयुष्याबद्दलही जरी काही करायचे असले तरीही 'कोणाला काय वाटेल?' हा विचार  मनात  आल्याशिवाय तो ते करू शकत नाही. आणि त्यामुळेच कित्येकदा जरी वाटत असले कि आयुष्यातला कोणताही बरा वाईट क्षण लिहावा, काहीतरी कराव; पण ते शक्यच होत नाही, लिहिल्या/ केल्या जातच नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या काही व्यक्तींशी निगडीत असतात, काही गैरसमाजांनी गोवल्या गेलेले असतात. आपल्याला झालेला समज आहे कि गैरसमज हे सुद्धा सांगण्या इतपत हिम्मत नसलेला प्राणी म्हणजे 'माणुस' होय. कारण तो समज आहे की गैरसमज; बरोबर आहे की चुक याची त्याला स्वतःला सुद्धा योग्य प्रकारे जाणीव झालेली नसते.
               गलितगात्र होऊन स्वतःच्या विचारांशी स्वतःच लढून नामशेष होणे हेच मनुष्याच्या जीवनाचा आखून दिलेला मार्ग असतो. आखून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर जाण्याचा कमी अधिक प्रमाणात सर्वच जण प्रयत्न करतात आणि चक्रव्युहात फसून 'मेढरांच्या कळपासारख चाकोरीतूनच चला' हा जीवनाचा आशय असल्याचा संदेश देतात. कोणी दुसऱ्या वाटेन जाण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरी त्याला स्वतःच्या आयुष्यातील आलेल्या अडचणी सांगून, कधी भावनांनी, कधी भौतिक सुखाच आमिष देऊन त कधी लादलेल्या जबाबदार्यांच्या ओझ्या खाली दाबून 'त्याच्या वैयक्तिक किंवा कोणाच्याहि स्वार्थासाठी' त्या चाकोरीच्या बाहेर न जाऊ देण्याचा केविलवाणा प्रकार केल्या जातो. कदाचित त्यांच्या वरही तोच लादण्यात आल्याने किंवा समाजाच्या 'हि' पद्धतच अंगवळणी पडल्याने हे घडत असावे. बदल हा सृष्टीचा नियम आहे तो या प्रकारातच का चुकवा?
             दिवसेंदिवस कोणत्याही नात्यातला भाव हा प्रेमापेक्षा स्वार्थाकडे जास्त कललेला काही काळापासून दिसत असला तरी आता भासायला लागला आहे. शेवटी कोणत्याही अपत्याचा जन्म हा जसा प्रेमातून होतो तसा त्यामागे स्वार्थ (भौतिक आणि मानसिक) हा असतोच. त्यामुळेच कदाचित 'स्वार्थ' प्रत्येकाच्या अंगवळणी पडत असेल व प्रत्येकाला भोगावे लागत असेल. अडाणी, शिक्षित आणि सुशिक्षित यांमध्ये फरक काय तो हाच कि ज्यांच्या दैनंदिन गरजा आणि स्वार्थाची पातळी अनुक्रमे जास्त प्रमाणात वाढत जाते. अर्थात काही अपवाद असतात. अगदी
कोणाकोणात स्वार्थ नसतोच असे नाही.
पण त्या लोकांना अपवादाच्या यादीत जाण्यापासून परावृत्त करण्याचे श्रेय घेण्यासाठी 'हि' काही लोक धडपड करतात; या समाजाच्या चांगल्या अंगाचा हा किती दुर्दैविपणा !

Friday, February 11, 2011

थोडं तिरपं-तारप

माणूस कोणत्याही गोष्टी शिवाय राहू शकतो पण एका गोष्टी शिवाय नाही आणि ती म्हणजे "सवय". बऱ्याच गोष्टीची माणूस सवय करून घेतो किंवा न कळत होते. माणसांची, खाण्याची, पिण्याची, रडण्याची, मरण्याची.....वगैरे. सवयी सारखी प्रेमळ, घातक आणि तितकीच चवदार गोष्ट दुसरी अशक्यच !!

निर्जीव आणि सजीव वस्तूंमध्ये मला असं वाटते दोनच फरक आहे; सजीव बोलू शकतात, निर्जीव नाही आणि निर्जीव सगळ्यांवरच प्रेम करतात; सजीव नाही. प्रत्येक सजीवाचा जन्म प्रेमातूनच होतो. मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो. पण वर्चस्व किंवा ताकद या कारणांमुळे तो आयुष्यभर आपल्या जन्माच्या मुळाला समांतर चालतो. कधी छेदतच नाही.

माणसाची फारच क्षुल्लक पण सगळ्यात जास्त त्रास देणारी इच्छा म्हणजे स्वतःला ऐकून घेण्याची. प्रत्येक समोरच्या माणसात प्रत्येक माणूस एकच गोष्ट शोधत असतो 'त्याला ऐकून घेणारी, सहन करणार व्यक्ती.'

हिरा हा कृत्रिम आहे आणि मोती हा नैसर्गिक. मोती हा मुळातच सुंदर, निसर्ग निर्मित, धीरगंभीर,  शांत  आणि  तेवढाच आकर्षक. विरक्त, दृढ़निश्चयी पण नेहमीच एकाकी आणि बंदिस्त. पण हिऱ्याला तासल जात. पैलू पडले जातात, त्यावर मेहनत घेतली जाते आणि मग तो हिरा बनतो. मुळात तो दगडच असतो तोही काळा.

Friday, February 4, 2011

संध्याकाळ

जीवनतील काही चुकून झालेल्या, काही 'समजुन' केलेल्या 'चुकां' बद्दल बरेचदा वाईट वाटते. अर्थात ही गोष्ट सगळे सांगत नसतील तरी सगळ्यांनाच त्याचे वाईट वाटत असते. फक्त चुकां बद्दलच नव्हे तर आपल्या कमी पडलेल्या प्रयत्नांची आठवण
झाल्यावर असो किंवा अपयशा बद्दल असो, खोट बोलाव लागलं त्यापेक्षाहि  काहीही कारणास्तव खोट बोललो असेल त्याबद्दल असो किंवा कोणाला निरपेक्ष केले असेल त्याबद्दल असो. अशा साठी  प्रत्येक इसमाला उभ्या हयातित कधी ना कधी वाईट वाटतेच. ज्या प्रमाणे सुर्याच्या उष्णतेची सर सकाळपासून रात्रि पर्यंत, उत्तरायणा पासून दक्षिणायना पर्यंत बदलत जाते तसेच माणसाच्या मनोबलाची, अहंकाराची , भावनेची अणि हिम्मतिची सर कमी जास्त होतेच. आणि बांध कधी ना कधी तुटतोच. त्या वेळेस जवळच्या वाटणाऱ्या  दोनच गोष्टी; पहिली आई अणि दुसरी एकांत, निरागस संध्याकाळ !!

दिवसाच्या प्रत्येक प्रहरामधे एक वेगळी शक्ति असते, एक वेगळा आनंद असतो, वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची ताकत असते. पण जीवनातिल प्रत्येक क्षणाशी, तो आनंदाचा असो वा दुखाचा, प्रणयाचा असो वा विरहाचा, किंवा केलेल्या चुकीचा असो त्या विषयी आपल्याशी बोलण्याची ताकत फक्त एकाच प्रहारत असते अणि तो प्रहर म्हणजे संध्याकाळ !

कधी व्यथा मनस्थितीत अशाच संध्याकाळी पाणावलेल्या डोळ्यांनी सुर्यनारायाणाकडे बघत असतांना एक विचार चमकून जातो की आसवांचा थोडा कमी ओघ वाहण्यासाठी त हा सूर्य रोज संध्याकाली प्रेमळ होत नसेल ना? त्याचा तो शेंदरी  रंग जे त्यागाच प्रतिक आहे  ते "तुझे दुःख त्यागुन दे" हे त खुणावत नसेल?