Friday, February 4, 2011

विश्व

विश्व म्हटले की नेहमी  पूर्ण भौतिक विश्व समजल्या जाते.. खर तर विश्वाची व्याख्या बनवणारे, समजावून देणारे, समजणारे, सांगणारे, उमजणारे सगळे विचारच असतात.

मला असे वाटते, मानवाने विचारांनी विणलेला  स्वकेन्द्रित कोष म्हणजे विश्व. कोश कुठे लांब कुठे आखुड, कुठे विरळ कुठे जाड. त्या कोश विणण्याच्या मर्यादे नुसारच दुसऱ्यांचे मूल्यमापन करायचे. त्या विश्वात आपल्या कोशाची स्वपरीक्षा न घेता, मर्यादा न परिक्षता, कोशाच्या बाहेर न निघून , दुसऱ्याच्या
कोशाशी एकरूप, मग्न न होउन मूल्यमापन करणे वा निर्णय देऊन मोकळे होणे हेच मुख्य  मानवाचे कर्म.

या विश्वात कमाल प्राणी आपला कोश मोठा करण्या ऐवजी दुसऱ्याचा किती लहान यामधे व्यथा
शक्ती खर्च करतात. ज्या विश्वाची जाणीव असायला पाहिजे त्या जाणिवेपासूनच दूर पळतात व शेवटी स्वतः चा कोश परिपक्व होण्याआधीच उघडे पडतात. अशा वेळेस; मर्यादेची जाणीव नाही, परिपक्वता नाही, वैचारिक पातळी नाही आणि म्हणूनच भरकटल्यामुले  भौतिक विश्वात पदार्पण करतात, त्याचा भाग होतात आणि तिथेच आयुष्य संपवतात.

No comments:

Post a Comment