Wednesday, February 2, 2011

"मी" पण..

आयुष्यात सगळ काही "मी" करू शकतो असा गोड़ गैरसमज असलेली लोक असतात पण थोड्या  आवक्याबाहेर असणाऱ्या किंबहुना समजण्यापलिकडे असणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात जिकडे "मी" मीरवताना दुर्लक्ष होते...

ज्या प्रमाणे कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ह्याचा हक्क मनुष्याला नाही त्याच प्रमाणे मरणाबद्दलचा सुध्हा. जशा जन्म अणि मृत्यु ह्या गोष्टी प्रत्येकावर थोपवल्या जातात  त्याच प्रमाणे 'आयुष्य', वैयक्तिक जीवन, एकटेपण, जबाबदाऱ्या, विचार, मैत्री, नाते, बंधने अशा बऱ्याच गोष्टी माणसावर लादल्या जातात. त्यातली प्रत्येक गोष्ट लादलीच जाते असे नाही पण यातली प्रत्येक गोष्ट किंवा एका पेक्षा जास्त गोष्टी कोणा ना कोणा वर तरी लादल्या जातातच. बाकी गोष्टी माणुस स्वीकारतो किंवा त्याही स्वीकारण्यास भाग पडले जाते.  

अर्थात त्या लादलेल्या गोष्टींची किम्मत लादणाऱ्या पेक्षा ज्यावर लादल्या गेल्या तोच आयुष्यभर भरतो... इथे मनुष्याची या संदर्भातली दुर्बलता कळते... म्हणूनच माणुस नियती पुढे लाचारच असतो. त्याची जाणीव कोणाला असते कोणाला नसते, कोणी जाणीव करून घेतो व कोणी मुद्दाम त्या कड़े डोळेझाक करतो..

माणुस स्वतःहाचे भविष्य घडवतो म्हणजे काय?   निर्भिड होउन, प्रत्येक अडचणीना योग्य वेळी, योग्य निर्णय घेउन आलेल्या संधीला/ वेळेला सामोरे जातो आणि त्याचे फलित त्याला चांगले किंवा वाइट मिळते. आता भविष्य घडवले म्हणजे चांगलेच फळ. माणुस नेहमी 'मी' हा निर्णय घेतला, 'मी' असे केले - तसे केले , प्रयत्नांची पराकाष्ट केली अणि 'हे' घडवले याचा डंका मिरवतो. पण पराकाष्टा करण्या आधी जर नियतीने तुम्हाला ती संधीच नसती  दिली तर? अशा संधी, आधीच्या संधीच्या निवड़ी वर अवलंबून, प्रत्येक वेळी नियती आपल्याला देऊन आपल्या सोबत खेळ  खेळत असते. अणि आपण त्या खेळाचे निर्माते आपण असल्याच्या भासात आपण आयुष्यभर जगतो(?)...... 

No comments:

Post a Comment